विराज जगताप हत्याकांड ;संपुर्ण भीम आर्मी जगताप कुटुंबीयांच्या खंबीरपणे पाठीशी
पिंपरी(वास्तव संघर्ष) : भीम आर्मी महाराष्ट्र राज्य यांनी आज पिंपळे सौदागर येथील विराज जगताप यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.विराज जगताप यांच्या हत्याकांडाची संपूर्ण चौकशी करून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी. भीम आर्मी दिवंगत विराज जगताप यांच्या कुटुंबीयांच्या खंबीरपणे पाठीशी आहे.
जगताप कुटुंबियांना सरकारने तात्काळ सर्वतोपरी मदत द्यावी. तसेच राज्यात मागासवर्गीय लोकांवर वारंवार हल्ले होत आहेत त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत. या सर्व घटनांवर सरकारने त्वरित लक्ष देऊन कायदेशीर कारवाई करावी. अशा मागण्यांचे निवेदन संबंध भीम आर्मी तर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले .
यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र अध्यक्ष नेहाताई शिंदे, महाराष्ट्र महासचिव सिताराम रंगवणे, पिंपरी-चिंचवड प्रमुख बाला उर्फ यमराज जगताप, पुणे जिल्हा प्रमुख – आबा सावंत आणि संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते