बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

खड्डयांमुळे मृत्यू घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पालिका प्रशासना विरोधात “निषेध” आंदोलन

पिंपरी (वास्तव संघर्ष): पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक महासंघ आणि शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेेच्या वतीने शुक्रवार (दि.25) रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन येथे रस्त्यावरील खड्डयांमुळे शाहूनगर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासना विरोधात “निषेध” आंदोलन” करण्यात आले. शहरातील रस्त्यांवर अनेक दिवसांपासून खड्डे पडले आहेत. खड्डयांमुळे नागरिकांना अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागत आहे .यामुळे शहरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी निवेदनाद्वारे देण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे,महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट, वाहतूक महासंघ अध्यक्ष  काशिनाथ जगताप,महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पिंपरी चिंचवड शहराचे उपशहराध्यक्ष वैभव छाजेड, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे,  युवकअध्यक्ष इम्रान शेख, दत्तात्रय जगताप, अकबर मुल्ला , कविता खराडे, मिरा कदम, दिपाली देशमुख, सविता धुमाळ, दिलीप शिंगोटे, रविंद्रकुमार भडाळे, मंगेश खंडागळे, सागर भुजबळ,योगेश सोनावणे, रविंद्र शिंदे, नितीन बुगासे, जयश्री जोगदंड, युवराज पवार, झिन्नत इनामदार, राजेश हरगुडे, प्रदीप गायकवाड, विजय दळवी,  दत्ता घुले,प्रभाकर कळमकर,किरण नेवाळे,युवराज पवार,विजय घोडके आदी शिवसैनिक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान,पूर्णा नगर शाहूनगर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नुकताच एका व्यक्तीचा अपघात होऊन बळी गेला असल्याने शहरातील सर्वच रस्ते खड्डे मुक्त करावेत अशी मागणी  निवेदनात करण्यात आले आहे .

Share this: