क्राईम बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक :जुन्नर येथील घरात आढळला मोठा शस्ञास्त्र व स्पोटकांचा साठा

पुणे – येथील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका व्यक्तीच्या घरात स्फोटकांचा साठा आढळून आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार उघडकीस आल्यामुळे सर्वञ खळबळ उडाली आहे. राजाराम अभंग असे या व्यक्तीचे नाव अाहे. रात्री उशीरा पोलिसांनी त्याचा घरावर छापा टाकत स्फोटकांचा साठा जप्त केला . तसेच त्याच्या घरातून ५९शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

पुणे एटीएस आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून हा साठा का करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या कारवाईत स्फोटक साहित्यांसह ५ पाईप बॉम्बकट्टे आणि रिव्हॉल्व्हर, तलवार व धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आली आहेत. स्फोटके काही दिवसांपुर्वी राजाराम अभंग याच्याकडे अशीच काही स्फोटके आढळून आली होती. राजाराम हा बॉम्ब बनवण्याचा शौकिन असल्याची माहिती पुढे आली आहे. २००४मध्ये घरगुती वादातून गावातच त्याने बॉम्ब उडविला होता.

राजाराम अभंग याला रात्री पोलिसांनी अटक केली असून आज, बुधवारी जुन्नर न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागात स्फोटकांचा साठा आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

 

Share this: