‘येडं पेरलं आणि खुळं उगवलं’ धनंजय मुंडे रावसाहेब दानवेंवर बरसले
वास्तव संघर्ष आॅनलाईन – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर चांगलेच बरसले आहेत . जालन्यात बोलताना रावसाहेब दानवे यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा उल्लेख करताना हेलिकॉप्टरचा पायलट असा उल्लेख केला होता. तेव्हा त्यांच्यावर टीकाही झाली होती. यानंतर आता धनंजय मुंडे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
बे एके बे
बे दुने चार
बे त्रिक बेअक्कलयांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष…
'येडं पेरलं आणि खुळं उगवलं' अशी गत आहे सगळी.https://t.co/RuwzxSnCJf
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 3, 2019
रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की, “यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष.” असे धनंजय मुंडे म्हणाले. इतकेच नाही तर, बे एके बे…बे दुने चार…बे त्रिक बेअक्कल अशा शब्दांत टीका करत येडं पेरलं आणि खुळं उगवलं असा घणाघातही त्यांनी केला आहे.