काळेवाडी रहाटणीत पुरग्रस्तांसाठी शिवसैनिकांचा मदतीचा हात;शिवसेना नेते हरेश नखातेंनी केली जेवणाची व्यवस्था
पिंपरी (वास्तव संघर्ष) चिंचवड शहरातील पुरग्रस्तांसाठी समाजाच्या विविध घटकांकडून सुरू असलेला मदतीचा ओघ अद्यापही सुरूच आहे. काळेवाडीतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसैनिकांनीही पुढाकार घेतला आहे.शिवसेनेचे चिंचवड विधानसभा संघटक हरेश नखाते यांच्यावतीने आज (मंगळवारी) काळेवाडीतील पुरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, शिवसेना विभागप्रमुख प्रदीप दळवी, गणेश वायभट, अंकुश कोळेकर, गोरख पाटील, अर्जुन कांबळे, प्रजाक नढे, लक्ष्मण टोनपे, अनिल पालांडे, बाळासाहेब येडे, मातोश्री ग्रुपचे अध्यक्ष गणेश आहेर, यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने या मदतकार्यात सहभागी झाले होते.काळेवाडीतील महाराष्ट्र कॉलनी, इंडियन कॉलनी, अय्यप्पा मंदिर परिसरातील सुमारे तीनशेहुन अधिक पुरग्रस्तांच्या जेवणाची व्यवस्था शिवसेना नेते हरेश नखाते यांनी स्वखर्चातून केली होती. यावेळी बोलताना नखाते म्हणाले की, कोणत्याही संकटकालीन परिस्थितीमध्ये शिवसैनिक मदतकार्यात अग्रेसर असतो. या वाईट परिस्थितीचे कोणतेही राजकीय भांडवल न करता माणुसकीच्या नात्याने सर्वांनी एकजुटीने या पुरबाधितांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे. अनेक नागरिकांचा संसार रस्त्यावर आला आहे. या संसाराची घडी पुन्हा कशी बसवायची हा मोठा यक्षप्रश्न पुरबाधितांसमोर आहे. मात्र या नागरिकांना मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून तशी मागणीही आम्ही करणार आहोत, असे आश्वासन हरेश नखाते यांनी दिले आहे.