क्राईम बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक : शोकसभेसाठी परवानगी मागणा-या सीआरपीएफ जवानास पोलिसांनी केली जबर मारहाण

बारामती (वास्तव संघर्ष) : जम्मू काश्मिर मधील पुलनामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांच्या शोकसभेची परवानगी मागावण्यास गेलेल्या सीआरपीएफ जवानास पोलिसांनी बेड्या घालून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडला आहे. सीआरपीएफ जवान अशोक बाबूराव इंगवले असे मारहाण झालेल्या जवानाचे नाव आहे.

सीआरपीएफ अशोक इंगवले हे जम्मू काश्मिर मधील पुलनामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांच्या शोकसभेसाठी परवानगी मागण्यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र तेथे त्यांना जबर मारहाण करण्यात आली, केवळ मारहाण केली नाही तर अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन बेड्या घालून लॉकअप मध्ये ठेवण्यात आल्याचा आरोप इंगवले यांनी केला आहे .

यामध्ये इंगवले यांना उजव्या हाताला जखमा झाल्या आहेत. तर त्यांची वर्दी देखील फाटली आहे. इंगवले हे ११८ बटालियनचे जवान आहेत. जवानास मारहाण झाल्याचे कळताच पोलिस ठाण्यात नागरिकांनी मोठी गर्दी केली. सबंधित पोलिस अधिकारी व कर्मचा-यांच्या निलंबनाची मागणी करण्यात येत आहे.

Share this: