बातम्या

भिम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांचे सोशलमिडीयावरील अकाउंट बॅन

वास्तव संघर्ष आॅनलाईन(प्रतिनिधी) – आपल्या आक्रमक शैलीत सत्ताधा-यांची झोप उडवणारे आणि सोशल मिडियावर नेहमी ‘अॅक्टीव’ असलेले भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांचे सोशल मिडियावरील अकाउंट डिअॅक्टीव करण्यात आले आहे.

भिम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांचे ट्विटर हे सोशलमिडीयावरील अकाउंट twitter India आणि twitter support या संस्थेकडून बॅन करण्यात आले आहे.विना या देशात खरचं अघोषित आणीबाणी सुरू झाली आहे. अशी प्रतिक्रिया ‘भिम आर्मी ‘चे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरून दिली.

सोशल मिडिया ही विशिष्ट वर्गासाठी आहे का?असा खडा सवाल देखील त्यांनी केला आहे.सोशल मिडियावर देखील अघोषित आणीबाणी सुरू असल्यांच चंद्रशेखर आझाद यांच म्हणने आहे.ट्विटर इंडिया आणि ट्विटर सपोर्ट कडुन चंद्रशेखर आझाद यांचे ट्विटर अकाउंट बॅन करण्यात आले आहे. आझाद यांचे ट्विटरवर २२ हजार फोलोवर्स होते.

दरम्यान  सोशल मीडियावरील देखील आमचा हक्क बळावला जात आहे. असी प्रतिक्रिया सध्या नेटकरी करत आहे

 

Share this: