दहिहंडीची वर्गणी कमी दिली म्हणून व्यापा-याला केली बेदम मारहाण
रहाटणी (वास्तव संघर्ष) :दहिहंडीची वर्गणी कमी दिली म्हणून एका व्यापा-याला टोळक्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे.ही घटना मंगळवारी (दि.09) रोजी रात्री आठच्या सुमारास राज स्नॅक्स स्वीट सेन्टर जयभवानी चौक रहाटणी लिंक रोड येथे घडली.
राहुल अरविंद गुप्ता यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आरोपी प्रसाद राऊत (वय-25) मनेश ऊर्फ मन्या कदम (वय-18 ) माऊली उपले (वय-21) यश रसाळ (वय-20) रोहित शिंदे ऊर्फ बन्द, सुनिल शेट्टी, विजय तनवा व त्याचसोबतचे इतर तीन ते चार आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हे राज स्नॅक्स अॅन्ड स्वीट सॅन्टर दुकानामध्ये येवून फिर्यादीचा भाऊ विवेक यास दहिहंडीच्या वर्गणीची मागणी करून त्याचे हातातील वर्गणीचे पुस्तक विवेक याचेकडे दिले.त्यावेळी विवेक याने त्यांना शंभर रुपये देवु केले परंतु आरोपी शेट्टी याने ते घेण्यास नकार देवून विवेक यांच्या कानाखाली मारली.आणि पाचशे रुपयांची मागणी केली त्यावेळी विवेक याने दोनशे रुपये देवू केल्याने आरोपी शेट्टी व विजय तलवारे यांना त्याचा राग आल्याने त्यांनी विवेक यास हाताने मारहान करण्यास सुरवात केली.त्यावेळी फिर्यादी त्यांना समजाऊन सांगत असताना विजय तलवारे सुनिल शेट्टी , माऊली उपल्ले यश रमाळ , रोहित शिंदे ऊर्फ बॉन्ड,मनेश अर्फ मन्या कदम , प्रसाद राऊत व त्यांचेसोबत इतर तीन ते चार लोक दुकानामध्ये घुसले सर्वांनी मिळून फिर्यादी राहुल तसेच फिर्यादीचा भाऊ विवेक व पवन यांना हाताने मारहान करुन दुकानामधील स्नॅक्स काउंटर खाली पाडले व स्वीट काऊंटरच्या काचा फोडुन आरोपी सुनिल शेट्टी व विजय तलवारे यांनी फिर्यादी व फिर्यादीचे भाउ याना ” तुम्हाला माहित नाही काय आम्ही या ऐरियाचे भाई आहोत ते असे म्हणून पुन्हा वरील सर्वांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहान केली.
आरोपी सुनिल शेट्टी याने तेथेच पडलेल्या लोखंडी कढईने फिर्यादी राहुल यांच्या डोक्यात मारुन जखमी केले.त्यावेळी आम्हाला भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या आईला ढकलून देवून वडिलांनाही हाताने मारहान केली.त्यांनतर स्नॅक्स काऊंटरच्या गल्यातील दिवसभरामध्ये झालेले अंदाजे 10 ते 12 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेवुन गेले .पुढील महिन्यापासून दर महिन्याला हप्ता चालू करायचा नाहीतर तुमचे आईवडिलांना मारुन टाकु अशी धमकी देवून दुकानासमोर आरडाओरडा करुन दहशत माजवून तेथुन सर्वजन निघून गेले.अधिक तपास वाकड पोलीस करित आहेत.