राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माॅ साहेब यांच्या 346 व्या पुण्यतिथीनिमित्त’ जिजाऊच्या लेकींचे’ अभिवादन

पिंपरी (वास्तव संघर्ष) राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माॅ साहेब यांची 346 वी पुण्यतिथीनिमित्त जिजाऊ माॅ च्या प्रतिमेला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर आम्ही जिजाऊचा लेकी म्हणत, एकमेका साहाय्य करू ही भावना मनी जपत गटाच्या माध्यमातून अनेक गरजू महिलांना, पुढील काळामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी, संसारामध्ये तडजोड करत असताना येणाऱ्या अडचणी तोंड देत असताना सर्व महिला एकत्रित येऊन या बचत गटाच्या माध्यमातून, लघुउद्योग आणि मध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणी या बचत गटाच्या माध्यमातून एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला .

यावेळी शहाजी पाटील यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. तसेच केशव हनुमंत वाघमारे राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जडणघडण, एक राजकन्या ते राजमाता अशा प्रवासाबद्दल मार्गदर्शन केले याप्रसंगी अॅड .सोनाली घाडगे , सौ. विजया मासाळ , सौ. वर्षा जाधव, सौ. गायत्री तळेकर, सौ. उमा धुमाळ, सौ. अनिता गवारे व इतर महिला भगिनी उपस्थित होत्या…

Share this: