सत्ता आल्यास आेवैसींना हैदराबादमधून पळवून लावू-योगी आदित्यनाथ
वास्तव संघर्ष – : हैद्राबाद येथील निवडणूक प्रचार सभेत उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एम. आय. एम खासदार असदुद्दीन ओवैसी यांना इशारा दिला आहे .ते म्हणाले हैदराबाद येथील निजामाला देखील त्यांची सत्ता सोडून पळून जावे लागले त्याचप्रमाणे तेलंगणात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यास असदुद्दीन आेवैसींना हैदराबाद सोडून जावे लागणार आमची सत्ता आल्यास असुवुदिन्न आेवैसींना हैदराबादमधून पळवून लावू असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. तेलंगणा विधानसभेसाठी ७ डिसेंबरला मतदान होणार आहे. योगी आदित्यनाथ तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी हैदराबादमध्ये आले असताना बोलत होते. ओवैसींचा पराभव करण्यासाठी भाजपने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या सभा आयोजित केल्या आहेत.मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान दूखील योगी आदित्यनाथ यांनी अली आणि बजरंग बली यांच्यावर वादग्रस्त विधान केले होते.आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर ते बोलले