पिंपरी चिंचवडमधील ‘या’ व्यक्तीसाठी सामान्य मिळकत करात शंभर टक्के सूट
पिंपरी (वास्तव संघर्ष ): पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्य करणा-या निवासी मिळकतधारकाचा कोरोनामुळे वर्ष 2020 – 21 आणि 2021 – 22मध्ये मृत्यू झालेला असल्यास त्याच्या कुटुंबाला दिलासा देणेकामी 2022-23 या सरकारी वर्षाकरीता कराचे व करदोत्तर बाबीचे दर निश्चित करताना अशा मिळकत धारकांना सामान्य कर रकमेत 100 टक्के सूट तसेच मिळकत कर हस्तांतरण नोंद नोटीस फी माफ करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
याकरीता 31 जानेवारी 2022 पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येणार असून सदर विषय महापालिका सभेकडे मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे, अशी माहितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकित एकूण 45 कोटी 16 लाख रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ॲड.
नितीन लांडगे होते. या बैठकीत विषय पत्रिकेवरील 38 आणि ऐनवेळेचे 5 अश्या एकूण 43 विषयांना मंजुरी देण्यात आली.