क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक :भररत्यात तरूणीला विवस्त्र करण्याची दिली धमकी

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पोलीस चौकीत तक्रार केली म्हणून एका तरुणीचा भररस्त्यावर विनयभंग करत तीला विवस्त्र करण्याची धमकी देण्यात आली आहे. घटना शुक्रवारी (दि.15)रोजी भाटनगर पिंपरी येथे राञी एकच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत 19 वर्षीय तरूणीने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शुभम मनोज बागडे (वय-24 रा . बिल्डींग नं. 7 भाटनगर पिंपरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाटनगर पिंपरी येथे राञी एकच्या सुमारास पिडीत फिर्यादी तरूणी पिंपरी पोलीस चौकी येथुन आरोपी शुभम याच्या विरुद्ध तक्रार देवुन भाटनगर येथील रस्त्याने आपल्या घरी जात असताना आरोपी शुभम हा फिर्यादी तरूणीच्या जवळ आला आणि म्हणाला ‘ तु माझ्या विरुद्ध पोलीस चौकीत तक्रार दिलीस का थांब आता तुला विवस्त्र करतो असे म्हणुन फिर्यादी तरुणींचा हात त्याच्या हातात धरुन फिर्यादी तरूणीला अंगावर ओढुन फिर्यादी तरूणीच्या छातीस हात लावला त्यामुळे फिर्यादी तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्याने फिर्यादी तरुणीने आरोपी शुभम विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: