बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

झुंज संस्थेचा कौतुकास्पद उपक्रम ;दिव्यांगांना दिले मोफत मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील ‘झुंज दिव्यांग संस्था’ व GTT फाउंडेशन या दोन्ही संस्था सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या संस्थेमार्फत दिव्यांग बांधव व समाजातील इतर घटकांसाठी वेगवेगळे कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. याच उद्देशाने गेल्या तीन महिन्यापासून दिव्यांग बांधवांना मोफत मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण देण्यात आले व संस्थेमार्फत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मोबाईल दुरुस्तीचे किट वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मान्यवरांनी व्यवसायामधील आव्हाने व अडचणी या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यकर्ते , रमणलाल बाफना व दत्तात्रय काळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.याप्रसंगी GTT फाउंडेशन व झुंज दिव्यांग संस्थेचे अधिकारी व पदाधिकारी, सागर काबरा, नितेश जाधव, राजू हिरवे, राजेश दिवटे , मल्हारश्री भालेकर, नूतन ताई रोहमारे अमोल मोरे, दादा काशीद ,गणेश रोहमारे, पाठक सर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना झुंज दिव्यांग संस्थेचे सचिव अमोल मोरे यांनी केली तसेच आभार संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे यांनी मानले.

Share this: