बातम्यामहाराष्ट्र

पुण्यामधील बिबवेवाडीत लाॅकडाउनमध्ये तळीरामांचा पत्रकावर खुनी हल्ला

पुणे (वास्तव संघर्ष) मंगळवारी तिसऱ्या लाॅकडाउनमध्ये सरकारने सुरू केलेल्या वाईन शॉपचा बातमीसाठी आढावा घेत असताना सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी येथील झोपडपट्टीमध्ये काही तरुण गाडीमध्ये व पिशव्यांमध्ये दारूचे बॉटल ३० ते ४० बाळगत असताना त्या तरुणांचा फोटो काढला असता, त्या तरुणांनी त्याचा राग मनात धरत संध्याकाळी ७:३० ते ८:०० च्या दरम्यान दारू पिऊन तीन तरुण व त्यांचा मेन लीडर असे मिळून चार जणांनी पत्रकार यांच्या राहत्या घरा जवळ खुनी हल्ला केला.

यामध्ये पत्रकार भूषण गरुड यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना जवळच्या चंद्रलोक खासगी रुग्णालयात बिबवेवाडी येथे दाखल करण्यात आले.
झालेल्या अशा घटनेमुळे तेथील परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होतेह तसेच पत्रकार झालेल्या हल्ल्याची घटना पत्रकारांना माहिती होताच प्रेस संपादक आणि पञकार सेवा पिंपरी चिंचवडच्या वतीने घटनेचा निषेध केला आहे. बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे .

Share this: