स्पा सेंटरच्या नावाखाली महिलांकडून वेश्याव्यवसाय करणा-या आरोपीला वाकड पोलिसांनी केली अटक
वाकड(वास्तव संघर्ष) स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय करणा-या आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. महिलांना पैशाचे आमिष दाखवून आरोपी त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होता. ही कारवाई गुरूवारी (दि.10 ) वाकड येथे छापा टाकून पोलिसांनी केली.
याप्रकरणी महिला फिर्यादीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दामाजी ज्ञानेश्वर मुरडे (वय ३८, रा. हडपसर, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पैश्याचे आमिष दाखवून महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यावसाय करून घेत होता. पोलिसांनी वाकड येथील टच रिलॅक्सो आणि बाणेर येथील मॉन्टॅनियन स्टिल वॉटर या स्पा सेंटरवर छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून 23 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.