राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमांची नोंद ठेवनाऱ्या ऑर्गनायझेशनचे नाशिक येथे उद्घाटन
नाशिक (वास्तव संघर्ष ) : जगभरात विश्वविक्रमांची नोंद होणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् च्या धर्तीवर भारतातून आता 360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् च्या माध्यमातून विश्वविक्रमांची नोंद होणार आहे.
360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स ही भारत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार असून नुकतेच याचे नाशिक येथील कार्यालयात या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.’360 बुक ऑफ रेकॉर्डस’ मार्फत गुणवत्तापूर्वक, सुजनशील कार्य, कला, क्रीडा व विविध प्रकारे आश्चर्यजनक आणि ऐतिहासिक कार्य करणाऱ्या विक्रमवीरांची नोंद यामध्ये होणार आहे.
360 बुक ऑफ रेकॉर्ड्स च्या नाशिक कार्यालयाच्या अनावरनाप्रसंगी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, फिल्म डायरेक्टर निलेश आंबेडकर, राहुल धारणकर, कार्व्हर ऍग्रोचे संचालक महेंद्र शिंगारे आदी उपस्थित होते.ज्यांना विश्वविक्रम करावयाचा आहे त्यांनी www.360WorldRecords.com या वेबसाईटवर जाऊन आम्हाला संपर्क करावा असे नाशिक चे हेड राहुल बनसोडे यांनी सांगितले आहे.
360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ची निर्मिती भारत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आगळेवेगळे कार्य करणाऱ्याचा सन्मान करण्यासाठी केली आहे. अगोदरचे माझे स्वतःचे 3 वेळेस आंतरराष्ट्रीय व 2 वेळा राष्ट्रीय रेकॉर्ड आहेत. त्यानंतर अनेकांना रेकॉर्ड्स करण्यासाठी मदत केली असून भारतीय लोकांना रेकॉर्ड्स करणे सोपे जावे म्हणून आता 360 बुक ऑफ रेकॉर्ड्सचे काम सुरू केले आहे.
राहुल बनसोडे
संस्थापक आणि संपादक ,360 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स