उकडलेले अंडे हातगाडीवर ठेवल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी केली अटक
भोसरी (वास्तव संघर्ष) : ज्वलनशिल पदार्थाचा वापर करून अंडी उकडून विक्री करणाऱ्या एका हातगाडी चालकाने कारवाई दरम्यान पोलिसांना धक्काबुक्की केली. याबाबत हातगाडी चालकला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना अंकुशराव लांडगे सभागृहासमोर भोसरी येथे बुधवारी ( दि. 30) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.
पोलीस नाईक भिल्लू मानसिंग राठोड यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
मंगेश सूर्यकांत सोनटक्के ( वय 30, रा. अंकुशराव लांडगे सभागृहाच्या मागे भोसरी )असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसरी पोलीस पेट्रोलिंग करत असताना अंकुशराव लांडगे सभागृहासमोर आले. आरोपी रहदारीच्या ठिकाणी हातगाडीवर ज्वलनशिल पदार्थाचा वापर करून धोकादायक पद्धतीने अंडी उकडून विक्री करत होता. हातगाडी चालकावर पोलिसांचे पथक कारवाई करण्यासाठी गेले असता, आरोपीने पोलिसांना धमकावून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तसेच पोलीस कर्मचा-यांना धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.