क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

अवैध मटक्याच्या धंद्यावर पोलिसांचा छापा; 12 जणांना पोलिसांनी केली अटक

File Photo

पिंपरी (वास्तव संघर्ष) राजगुरव कॉलनी तळेगाव दाभाडे येथील एल शहाय बंगला येथे काहीजण मटक्याचा जुगार खेळत असल्याची माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकाला मिळाली . त्यानुसार , पोलिसांनी छापा मारून 12 जणांना अटक केली आहे

याप्रकरणी खंडणी दरोडा विरोधी पथकाचे आशिष बनकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

नवीन राजेंद्रप्रसाद गोयल ( वय 31 , रा . तळेगाव दाभाडे ) , कैलास चंद्र नायक ( वय 45 , रा . ओरिसा ) , मारुती चिमाजी मोरे ( वय 60 , रा . मुंबई ) , सूर्यकांत वासुदेव सातवसे ( वय 61 , रा . डोंबिवली ) , लक्ष्मीहार भगवान नाईक ( वय 48 , रा . ओरिसा ) , अशोक सियासरन लाल ( वय 48 , रा . गोरेगाव ईस्ट , मुंबई ) , हिरालाल बन्सीलाल गुप्ता ( वय 62 , रा . जोगेश्वरी ईस्ट , मुंबई ) , आरीफखान चाँदखान इनामदार ( वय 67 , रा . भांडुप , मुंबई ) , गणेश दाजी ठोंबरे ( वय 44 , रा . सांगली ) , केशरीनाथ रामभाऊ म्हात्रे ( वय 54 , रा . पेन रायगड ) , सपन अभिमन्यू नायक ( वय 42 , रा . ओरिसा ) , मलप्पा शिवरुद्र वराळे ( वय 61 , रा . मुंबई ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत . यांच्यासोबत महम्मद , प्रकाश बटव ( रा . मुंबई ) , गणेश कुल ( रा . तळेगाव दाभाडे ) यांच्या विरोधात गन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , राजगुरव कॉलनी तळेगाव दाभाडे येथील एल शहाय बंगला येथे काहीजण मटक्याचा जुगार खेळत असल्याची माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकाला मिळाली . त्यानुसार , पोलिसांनी छापा मारून 12 जणांना अटक केली . आरोपी जनता बाझार मटक्याच्या एजंटकडून मोबाईल फोनद्वारे बेटिंग घेत होते . पोलिसांनी या कारवाईमध्ये 27 मोबाईल फोन , मटक्याचे साहित्य असा काण 28 हजार 940 रुपयांचा ऐवज जप्त केला . पोलीस उपनिरीक्षक हिवरकर तपास करीत आहेत .

Share this: