क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

चिखलीतील अनधिकृत बांधकामावर पालिकेची मोठी कारवाई

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने चिखलीतील जाधववाडीतील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.आज दि 3 फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच ही कारवाई केली जात आहे. लाॅकडाऊननंतर अनधिकृत बांधकामांवर केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे .

चिखली वडाचा मळा (सिल्व्हर जिम समोरील भाग ) पत्रा शेड वर आज कारवाई केली आहे. सदर कारवाई मध्ये एकूण १,५०,००० स्वेकर फूट बांधकाम निष्कासन करावयाची करण्याचे आदेश होते त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सदर ठिकाणी २ पोकलेन , ७ जेसीबी , २ क्रेन , १०५ पोलिस, १०सहा.पोलिस निरीक्षक, ३पोलिस निरीक्षक, १ सह. पोलिस उपायुक्त,अजित पवार,अतिरिक्त आयुक्त मनपा, .मनोज लोणकर उपायुक्त ,३ कार्यकारी अभियंता, ५ उपअभियंता, १० कनिष्ठ अभियंता, २५ बीट निरीक्षक १०० मजूर असा फौज फाटा होता. तर कारवाई पासून वाचण्यासाठी काही लोक आपले अनधिकृत बांधकाम स्वताहून काढून घेतले आहे .

क क्षेत्रिय कार्यालय मौजे चिखली ( प्रभाग क्र 2 ) जाधववाडी , कुदळवाडी भागातील १८ मी देवराई डी .पी रोडलगतच्या अनधिकृत पत्राशेड व बांधकामावर आज महापालिकेची बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली सदर कारवाई मध्ये कुदळवाडी मधील गट नः२५६ ,२५७, २५८, २५९ येथील सोबत जोडलेल्या यादीनुसार एकूण ६८ अनधिकृत पत्राशेड असे एकूण क्षेत्रफळ अंदाजे १,४६ ,००० चौ .फूट पाडण्यात आली आहेत.

सदर प्रसंगी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात यापुढेही ठिकठिकाणी झालेल्या व्यापारी अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात येणार असुन सदर पत्राशेड धारकांना पत्राशेड काढून घेण्याचे व होणारे नुकसान टाळण्याचे आवाहन केले आहे

Share this: