क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

अवैध गांजा बाळगणा-या एकाला निगडी पोलिसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड येथील निगडी पोलीसांनी अवैध गांजा बाळगणा-या एका आरोपीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. ओटा स्किम निगडी येथे गुरुवारी (दि.30) केली.

राजेंद्र सुरेश पवार (वय 21, रा. सिध्दार्थनगर , पञाशेड झोपडपट्टी ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिस नाईक संदीप गोपीचंद पाटील यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील नमुद तारीख वेळी व ठिकाणी नमुद आरोपी याने त्याचे ताब्यात ३,०७,५०० / – रु . किं . चा १२ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशिर रित्या कब्जात बाळगताना मिळुन आला. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this: