बातम्या

नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या मुलींनी देवेंद्र फडणवीस यांना केली ही तक्रार

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या चिमुकलीसोबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधला. त्यावेळी केंदळे यांच्या मुलीने फडणवीस यांच्याकडे ‘मला भेटायला यायचं होतं. पण पप्पांनी आणलं नाही’ अशी गोड तक्रार केली.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई मधील निवासस्थानी भेट घेतली यावेळी नगरसेवक उत्तम केंदळे आणि अन्य नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते त्यावेळी नगरसेवक केंदळे यांच्या मुलीला देवेंद्र यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा असल्याचे त्यांनी फडणवीस यांना सांगितले. त्यावर फडणवीस यांनी केंदळे यांच्या मुलीचा हट्ट पुरवला.

Share this: