बातम्यामहाराष्ट्र

रामदास आठवले यांचा नवा पॅटर्न ;प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात नगरसेवक आमदार खासदार आमचाच

मुंबई (वास्तव संघर्ष) : रिपब्लिकन पक्षाचा मुंबईत प्रत्येक तालुक्यात किमान 1 नगरसेवक; जिल्ह्यात 1 आमदार आणि मुंबईच्या लोकसभेच्या 6 जागांपैकी 1 खासदार रिपब्लिकन पक्षाचा निवडून आला पाहिजे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना केले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंड च्या महाकवी कालिदास नाट्यमंदिरात रिपाइंचा मुलुंड तालुका निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ना रामदास आठवले यांनी कार्यकर्त्याना आवाहन केले.मुलुंडमध्ये आरपीआयचा नगरसेवक झालाच पाहिजे हाच निश्चय व्यक्त करण्यासाठी मुलुंड तालुक्यातर्फे रिपाइं चा निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला आहे असे रिपाइं तालुका अध्यक्ष योगेश शिलवन्त यांनी प्रास्ताविक भाषणात स्पष्ट केले.मनोज कोटक खासदार झाल्याने त्यांचा नगरसेवकपदाचा वॉर्ड रिक्त आहे. ती जागा आरपीआय ला मिळावी.तसेच भाजप च्या एका नगरसेवकावर स्थानिक जनता नाराज आहे. तो वॉर्ड नंबर 111 हा आरपीआय ला मिळावा अशी मागणी यावेळी रिपाइं तर्फे पक्ष प्रमुख ना रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आली.

स्थानिक झोपडपट्टीवासीयांची मागणी आहे की मुलुंड मध्ये आरपीआयला एक जागा सोडल्यास रिपाइं चा नगरसेवक निश्चित निवडून येईल असे मनोगत रिपाइं च्या मुलुंड मधील सर्व कार्यकर्त्यानी एकजुटीने व्यक्त केले.प्रत्येक तालुक्यात एक वॉर्ड आरपीआय ला सुटावा अशी मागणी आहे.मुंबईत किमान 40 जागा आरपीआय ला सोडाव्यात.

मुंबईत प्रत्येक जिल्ह्यात 1 याप्रमाणे विधानसभेच्या कीमान 6 आणि लोकसभेची किमान 1 जागा आरपीआय ला मिळावी यासाठी आपण प्रयत्न करू. मुलुंड मध्ये रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद आहे त्यामुळे मुलुंड च्या 6 वॉर्डपैकी 1 वॉर्ड आरपीआय ला सोडावा यासाठी मित्रपक्ष भाजप कडे शब्द टाकणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी दिले.

पालिका निवडणुकीत 1 जागा मिळावी असा निर्धार करण्यापेक्षा आपला देश मजबूत करण्याचा निश्चय करा असे आवाहन यावेळी ना रामदास आठवले यांनी केले.पालिका निवडणुकीत मित्रपक्षाकडे 1 जागा सोडावी अशी मागणी करण्यापेक्षा आपला पक्ष आपल्या वॉर्ड तालुका जिल्ह्यात मजबुत करा.त्यासाठी आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक ना रामदास आठवले यांचा आदर्श घेऊन जनतेसाठी पक्ष वाढीसाठी कष्ट करा असे आवाहन रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला यांनी केले. मित्रपक्षाला समजून घेऊन युतीच्या राजकारणात संयमाची भूमिका घ्यायची असते असा सल्ला रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना दिला. यावेळी रिपाइं जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड; राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव; विलास तायडे; साहेबराव सुरवाडे दादासाहेब झेंडे; मुस्ताक बाबा अजित रणदिवे अंबर केदारे; संजय अडगावकर; रंजना नायर; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share this: