बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

प्रशांत शेट्टी प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

१५ऑगस्ट २०१९ पर्यंत इच्छुकांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन
पिंपरी (वास्तव संघर्ष ) : प्रशांत शेट्टी प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऑक्टोबर 2019मध्ये होणा-या या विवाह सोहळ्यात 101 सामुदायिक विवाह लावण्याचे उद्दिष्ट आहे. इच्छुक वधुवरांना प्रतिष्ठानच्या वतीने मोफत संसारोपयोगी साहित्य, व-हाडी मंडळींना जेवण, वधुवरांना पोषाख, वधुचे दागिने, हारफुलांसह पत्रिका देण्यात येतात. या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणा-यांनी दि. 15 ऑगस्ट 2019 पर्यंत निमंत्रक व माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी – 9923203680 व स्वागताध्यक्ष नगरसेवक विजय ऊर्फ शीतल शिंदे -9850905033 (कार्यालय पत्ता : श्रीधर अपार्टमेंट, शॉप नं.3, श्रीधरनगर, चिंचवड पुणे 33) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी वधुवरांचे दोन फोटो, जन्मतारखेचा पुरावा, आधारकार्ड आणि घरातील दोन साक्षीदारांचे पुरावे हे प्रतिष्ठानचे कार्यालय प्रशांत शेट्टी प्रतिष्ठान, स्कायहिल अपार्टमेंट, आयडीबीआय बँकेजवळ, मुंबई पुणे महामार्ग, चिंचवड पुणे 19 येथे जमा करावेत.

प्रशांत शेट्टी प्रतिष्ठानच्या वतीने ताम्हीणी घाटातील पोमगाव येथे मोफत प्राथमिक आरोग्य केंद्र चालविण्यात येते. प्रतिष्ठानच्या वतीने क्रीडा उपक्रमांतर्गत शरीरसौष्ठव स्पर्धा, कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात येतात. तसेच वारक-यांना व अनाथ आश्रमांमध्ये अन्नदान व औषध साहित्य वाटप करण्यात येते, अशी माहिती निमंत्रक प्रसाद शेट्टी व स्वागताध्यक्ष शीलत शिंदे यांनी शुक्रवारी (21 जून) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Share this: