वीस वर्षीय तरुणीचा 45 वर्षीय पुरूषाने केला विनयभंग ;सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात राहणाऱ्या तरूणीला एक 45 वर्षीय पुरूष दोन वर्षांपासून वारंवार पाठलाग करत तीला मानसिक त्रास देत होता . तसेच माझी विद्यापिठात सेंटींग आहे तू मला हो नाही म्हणालीस तर तुला सर्व विषयात नापास करण्याची धमकी दिली . तसेच तीचा विनयभंग केला. याबाबत पिडीत 20 वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रकांत काशीनाथ जाधव ( वय 45 , रा . पिंपळे निलख ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,फिर्यादी तरुणीला आरोपी जाधव हा वेळोवेळी पाठलाग करीत असे . माझी विद्यापिठात ओळख आहे . तुला सर्व विषयात नापास करतो , अशी धमकीही फोन करून आरोपीने फिर्यादी तरुणीला दिली. त्यानुसार पाठलाग करणार्या आरोपीला तरूणीने जाब विचारला असता तो म्हणाला ‘ तुला काय करायचे ते कर . मी तुला आता सोडणार नाही , ‘ अशी पुन्हा धमकी दिली . झालेल्या प्रकाराबद्दल तरूणीने पोलिसात तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवला आहे . सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत .