क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

तब्बल 255 तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून फसवणा-या भामट्यांना पिंपरी-चिंचवड पोलीसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) : तुम्ही हिंदी चित्रपट ‘गरम मसाला’ हा बघितला असेलच त्यामधील नायक अक्षय हा वेगवेगळ्या तरूणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो नंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवून ‘साखरपुडा’ करायचा आहे. म्हणून त्या मुलींना हाताच्या बोटात रिंग घालून फसवत असतो. अशा एक ना अनेक मुलींना तो फसवत असतो. याच चित्रपटाची कथा तंतोतंत घडली आहे. ‘लैविश लाईफ’ चे जीवन दाखवत तरुणींना आपल्या जाळयात ओढायचे. नंतर त्यांची आर्थिक फसवणूक करायची असा उद्योग करणा-या दोन भामट्यांला पिंपरी-चिंचवड पोलीसांनी अटक केली आहे.

निशांत रमेशचंद्र नंदवाना आणि विशाल हर्षद शर्मा अशी अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निशांत आणि आरोपी विशाल लग्न जमवणा-या मॅट्रोमोनियल वेबसाईटवरुन तरुणींशी ओळख करायचे. तसेच त्यांच्याशी जवळीक वाढवून चॅटिंग मग डेंटिग करायचे . त्यानंतर मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगत ब्रँडेड कार मधून त्यांना फिरवयाचे. तरुणींचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना आपण कस्टमचा व्यवसाय करू म्हणजे भविष्यात आपण सेटल होऊ असे सांगायचे. त्यासाठी तरुणींकडून लाखो रुपये उकळत होते. त्यानंतर काही दिवस तरुणींच्या सोबत राहून नंतर मोबाईल बंद करून फरार व्हायचे. आतापर्यंत या दोघांनी तब्बल दीड कोटीहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .

आरोपी हे वेगवेगळ्या नावाने राहात असल्याचं समोर आले आहे. आरोपी निशांत रमेशचंद्र नंदवाना हा पुण्यात अधितांश अग्निहोत्री, बंगळुरु येथे अभय कश्यप आणि गुरगावमध्ये आधव अग्निहोत्री अशी बनावट नावे वापरून तरुणींना फसवत असत. दुसरा आरोपी विशाल हर्षद शर्मा हा पुण्यात आश्विक शुक्ला, बंगलोर येथे अथर्वन तिवारी आणि गुरगावमध्ये अव्यागृह शुक्ला, रुद्रान्स शुक्ला, देवांश शुक्ला किंवा अचैत्य शुक्ला नावाने तरुणींना फसवत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.या फसवणुकी दरम्यान अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दोन्ही आरोपींनी मिळून पुणे, बंगळुरु आणि गुडगाव येथील एकूण 255 मुलींना फसवल्याचे समोर आले आहे.अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Share this: