बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी मधील मीडिया मध्ये किती  प्रसिद्धी  मिळते यावर माझे मताधिक्य ठरणार -राजाराम पाटील 

पिंपरी (वास्तव संघर्ष) मावळ लोकसभेचे वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार राजाराम पाटील यांच्या वतीने आज पिंपरि मध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले की, आपण किती मताधिक्याने निवडून येणार यावर ते म्हणाले की पिंपरी चिंचवड मधील मीडिया मला उद्या किती प्रसिद्धी देते यावर माझे मताधिक्य ठरणार  आहे.

राज्यातील घराणेशाहीच्या विरोधात वंचित आघाडी ने आता लढा द्यायचे ठरवले आहे.  राज्यभर अॅड :बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सध्या निवडणूक लढवली जात आहे.  मावळ चे लोकसभा  उमेदवार  राजाराम पाटिल, शिरूर चे उमेदवार राहुल ओव्हाळ  यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी  पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेतली.  यावेळी पिंपरी चिंचवड भारिप  शहराध्यक्ष  देवेंद्र तायडे, वंचित बहुजन आघाडी पुणे फ्रंट समन्वयक स्वाती कदम, रजनीकांत क्षीरसागर, गुलाब पानपाटील, रुहिनाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

धरणग्रस्तांना अजून मोबदला मिळालेला नाही, मावळ गोळीबार  मधील मृत्यू झालेल्या लोकांना तुटपुंज्या प्रकारची मदत केली,  लघुउद्योग  संपवले गेले, स्थानिक बिल्डर यांनी राजकारण्यांच्या बरोबर हाथ मिळवून अनेक मोक्याच्या जागा घशात घातल्या  आहेत.  होलार आगरी कोळी बोद्ध मुस्लीम लोकांना उमेदवारी दिली आहे.   यावेळी राहुल ओव्हाळ यांनी सांगितले की मनूवादी  विचाराविरोधात आमची लढाई सुरू आहे.

सोमवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून  रॅली आणि कॉर्नर सभा घेणार असल्याची माहिती ही त्यांनी  मावळ आणि शीरूर साठी अॅड. बाळासाहेब आंबेडकर प्रचार सभा घेणार आहेत परंतु अद्याप त्यांची तारीख ठरलेली नाही  लवकर ठरणार असेही ते यावेळी म्हणाले.

Share this: