धक्कादायक :पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी नवीन सहा रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पुणेशहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातील आता झपाट्याने कोरोना बाधित रुग्णांची वाढ होऊ लागली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आताच मिळालेल्या माहितीनुसार नवीन सहा रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये प्रत्येकी तीन महिला आणि पुरुष आढळले आहेत शहरातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या आता ४३ झाली आहे.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हे रूग्ण दाखल असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्यांनी दिली. शहरात मंगळवारी एका दिवसात सहा रूग्ण आढळले. या सर्वांच्या घशातील स्रावाचे तपासणी अहवाल पॉझेटिव्ह आले आहेत. शहरात आतापर्यंत कोरानाने 1 रूग्णांचा बळी घेतला असून . 12 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.