बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी – चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक रामदास बोकड यांचे निधन

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी – चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक रामदास बोकड ( वय 60 ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने काल ( शुक्रवारी ) रात्री निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे . महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत पिंपळे गुरव मधून रामदास बोकड बिनविरोध निवडून आले होते . त्यांनी क्रीडा समितीचे सभापतीपद देखील भूषविले होते .

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे ते अतिशय जवळचे कार्यकर्ते होते . सह्याद्री आदिवासी तरुण मंडळाचे बोकड काही काळ अध्यक्ष होते . आदिवासी समाजाचे कार्यकर्ते म्हणून रामदास बोकड यांची ओळख होती . समाजातील नागरिकांच्या अडी – अडचणीसाठी ते धावून जात असत . सामाजिक कार्यकर्ते ते नगरसेवक असा त्यांचा प्रवास होता .

रामदास बोकड यांना शुक्रवारी त्रास होत होता . त्यांना पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते . त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती . रात्री ११ च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला . त्यात त्यांचे निधन झाले आहे . सांगवीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर आज ( शनिवारी ) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले .

Share this: