Video मातंग आरक्षणासाठी रस्ता रोको; पोलीस व आंदोलकात बाचाबाची
पिंपरी (वास्तव संघर्ष ) – मातंग समाजाला लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील तरुण कै संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेऊन प्राणत्याग केला या निषेधार्थ शहरातील मातंग समाजाच्या वतीने पिंपरी येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर संतप्त आंदोलकांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस व आंदोलकात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व नायब तहसीलदार यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले त्यात असे म्हणले आहे की, अनेक वर्षापासुन मातंग समाजावर अन्याय होत असुन शासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही मातंग समाजाचे लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार आरक्षण मिळत नसल्यामुळे संजय ताकतोडे या युवकाने आत्महत्या केली आहे, याची राज्यभर आक्रमक निदर्शने व आंदोलने होत आहेत, सरकारने आरक्षणाबाबत सकारात्मक पावले उचलावीत व टाकतोडेंच्या कुटूंबियांना ५० लाख रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यात केली आहे
निषेध सभा झाल्यानंतर आंदोलकांनी आक्रमक भुमिका घेत मानवी साखळीद्वारे रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पिंपरी पोलीस व आंदोलकात बाचाबाची झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले, आंदोलकांची आक्रमकता पाहुन पोलिसांनी नमती बाजु घेतली व ताब्यात घेतलेल्यांना सोडून दिले त्यामुळे वातावरण शांत झाले.
यावेळी भाऊसाहेब अडागळे, मनोज तोरडमल, अरुण जोगदंड, शिवसेनेचे युवराज दाखले, धनंजय भिसे, दत्तु चव्हाण, नितीन घोलप, शिवाजी साळवे, भिमा वाघमारे, संजय ससाणे, विशाल कसबे, आशा शहाणे, महेश खिलारे, अनिल सौंदडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.