हिजड्याशी लग्न केलं तर त्याला मुलं होतील,पण सिंचन योजना काही पूर्ण होणार नाहीत – नितीन गडकरी
हिजड्याशी लग्न केलं तर त्याला मुलं होतील,पण सिंचन योजना काही पूर्ण होणार नाहीत – नितीन गडकरी
सांगली – ‘एकवेळ हिजड्याशी लग्न केलं तर त्याला मुलं होतील, पण सिंचन योजना काही पूर्ण होणार नाहीत असं आम्हाला वाटलं होतं, पण भाजप सरकारनं सिंचन योजना पूर्ण करून दाखवली,’ असं वादग्रस्त विधान गडकरी यांनी सांगलीतील शेतकरी मेळाव्यात टेंभू सिंचन योजनेसंदर्भात बोलताना गडकरी यांनी हे विधान केलं. वादग्रस्त विधानांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जीभ पुन्हा घसरली आहे.
टेंभू योजना अनेक वर्षांपासून रखडली होती. ती पूर्ण होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. खरं तर इथे ते बोलू नये. एक वेळ हिजड्याशी लग्न केलं तर मुलं होतील, पण सिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही. भाजप सरकारच्या काळात ते पूर्ण झाले. येथील शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. तसंच यांसारख्या अनेक योजना भाजप सरकारच्या काळात पूर्ण झाल्या,’ असेही यावेळी नितीन गडकरी म्हणाले.
वादग्रस्त वक्तव्यांमुळं गडकरी चर्चेत आहेत. त्याबाबत गडकरी यांनी स्पष्टीकरणही दिलंय. माझी वक्तव्ये तोडूनमोडून दाखवली जात आहेत. माझी आणि पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी विरोधी पक्ष आणि मीडियावर केला. हे स्पष्टीकरण देऊन काही तास उलटत नाहीत, तोच त्यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.