क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

चहाचे बिल दिले नाही म्हणून मित्राच्या डोक्यात घातला दगड

पिंपरी(वास्तव संघर्ष) : चहाच्या बिलावरून झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाला दगडाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी मित्राला अटक करण्यात आली आहे. चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे मंगळवारी (दि-26) ही घटना घडली.

याप्रकरणी गौस सय्यद शेख (वय-24, रा. वाल्हेकरवाडी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार मानतेश उत्तम याळगी (वय-20, रा. बिजलीनगर), अल्ताफ शेख, कमल चांडालिया, मुट्या यांच्यावर गुन्हा दाखल करून मानतेश याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या ओळखीचे असलेले आरोपींसोबत चहा पिण्यासाठी आकुर्डी स्टेशनजवळ आले होते. चहा पिल्यानंतर बिलावरून आरोपी व फिर्यादी यांच्यात किरकोळ वाद झाला. त्याकडे दुर्लक्ष करून फिर्यादी घराकडे जात असताना आरोपी पाठीमागून दुचाकीवर आले. त्यांनी फिर्यादीला मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ केली. अल्ताफ याने रस्त्यावर पडलेला टोकदार दगड घेऊन फिर्यादीच्या कपाळावर मारून गंभीर जखमी केले. फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत,दमदाटी करून पळून गेले. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.

Share this: