राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी तुषार कामठे
पिंपरी (वास्तव संघर्ष) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या पिंपरी- चिंचवड शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिम्बीओसिस कॉलेज पुणे येथे राष्ट्रवादी इंजिनिर्स सेलच्या उदघाटनप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते कामठे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी पुणे शहारध्यक्ष प्रशांत जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, अजय शितोळे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, संतोष कोकणे, संजय नेवाळे, काशिनाथ जगताप, काशिनाथ नखाते, प्रशांत सपकाळ, सामाजिक न्याय अध्यक्ष मयूर जाधव, देवेंद्र तायडे, राजन नायर, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, महेश इंगवले, अमित लांडगे, योगेश कामठे, संतोष कामठे, तेजस शिंदे, महेश कामठे, राहुल कामठे, प्रतीक दळवी, सौरभ गाते, संजीवनी पुराणिक आदी उपस्थित होते.