वांझोट्या बाईला स्ञीत्व नसतं आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक – संभाजी भिडे
वास्तव संघर्ष आॅनलाईन :-वांझोट्या बाईला स्ञीत्व नसतं असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं तसंच राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक आहे असे देखील संभाजी भिडे म्हणाले आहेत संभाजी भिडे यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर सुधारित नागरिकत्व कायदा हा देशाला बळ देणारा कायदा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
जगातल्या १८७ देशांमध्ये नागरिकत्वासंबंधीचा कायदा आहे. मग भारतात हा कायदा का नको? CAA ला विरोध करणारे लोक देशाची दिशाभूल करत आहेत. ममता बॅनर्जी यांनी या कायद्याची मागणी केली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा कायदा आणला होता. आता हेच लोक या कायद्याला विरोध दर्शवत आहेत ही बाब आश्चर्यकारक आहे असंही भिडे यांनी स्पष्ट केलं.