क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पञकार संतलाल यादव यांच्यावर प्राणघातक हल्ला ;दहा ते बारा आरोपीवर गुन्हा दाखल

पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड शहरात सिद्धांत समाचार या दैनिक वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक तसेच रफ्तार बुलेटिनचे मुख्यसंपादक संतलाल यादव यांच्यावर गुडांनी प्राणघातक हल्ला केला आहे.ही घटना बुधवार दि. २५ रोजी सकाळी आठच्या सुमारास काळेवाडी येथे घडली आहे.

याप्रकरणी आरोपी महेश नढे, किरण नढे व त्यांचे वडील , नवनाथ नढेसह त्यांचे सहा ते सात(सर्व राहणार, काळेवाडी पिंपरी चिंचवड) साथीदारांवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतलाल यादव यांच्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांची दोन्ही मुले जखमी झाली आहेत. घटनेचा अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.

पञकार संघटनेकडून जाहीर निषेध

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आणि श्रमिक पत्रकार संघ यांनी पञकार संतलाल यादव यांच्यावर केलेल्या हल्ल्यांचा जाहीर निषेध नोंदविला असून आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे .
तसेच पत्रकार संरक्षण कायद्याच्या कलमाखाली तक्रार दाखल करून पोलिसांनी याची त्वरित चौकशी करावी व संबंधित गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

Share this: