क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील खराळवाडीत तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

पिंपरी(वास्तव संघर्ष) : प्रतिनिधी इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून १९वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. पोलिसांना तिच्या खोलीमध्ये सुसाईड नोट मिळून आली आहे. ही घटना बुधवारी (दि. २०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खराळवाडी येथे घडली. वर्षा शंकर जगताप (१९, रा. एचए कॉलनी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा हिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून, ती घरीच असते. बुधवारी सायंकाळी अचानक ती घराबाहेर पडली. तिने खराळवाडी येथील खराळआई उद्यानानजीकच्या वैष्णवी पार्क या सोसायटीतील इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारली.

लिफ्टच्या डक्टमध्ये जोरदार आवाज आल्याने सोसायटीतील रहिवाशांनी तिला तत्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पोलिसांना तिच्या खोलीमध्ये एक सुसाईड नोट मिळून आली आहे. ‘मी आत्महत्या करीत आहे, मला शोधू नका’ असे त्या चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.  तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

Share this: