बातम्यामहाराष्ट्र

माझ्या हाती सत्ता द्या, मी चमत्कार घडवून दाखवेन- राज ठाकरे

मनसेच्या प्रत्येक नगरसेवकाने चांगले काम केले आहे. या निवडणुकीत मनसेचे दोन नगरसेवक पुणे महापालिकेत निवडून आले आहे. ते दोघेही चांगले काम करीत आहे. त्यामुळे त्यांना उभा महाराष्ट्र ओळखतो, याचा मला अभिमान आहे असेही ठाकरे यावेळी म्हणाले 

पुणे (वास्तव संघर्ष) ‘मी निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची वाट पाहतो आहे. माझा तोफखाना तयार आहे. निवडणुका आल्यावर मी तोफखाना घेऊन येईन, आणि योग्य ठिकाणी त्याचा वापर करेन,’ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिला आहे. ‘माझ्या हाती सत्ता द्या, मी चमत्कार घडवून दाखवेन,’ या वक्तव्याचाही त्यांनी पुनरूच्चार केला आहे. ते कोंढवा येथील स्व. राजेंद्र बाळासाहेब लोणकर ई-लर्निंग स्कूलच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

त्यावेळी मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर, आरती बाबर, रूपाली पाटील, किशोर शिंदे या वेळी उपस्थित होते. ‘प्रत्येक वेळी बोलायलाच हवे, असे काही नाही. सारखे बोलून लोकांना कंटाळा येतो. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली, की मी पुण्यात येईल आणि माझी भूमिका मांडेन,’ असेही ठाकरे म्हणाले.

‘मनसेच्या प्रत्येक नगरसेवकाने चांगले काम केले आहे. या निवडणुकीत मनसेचे दोन नगरसेवक पुणे महापालिकेत निवडून आले आहे. ते दोघेही चांगले काम करीत आहे. त्यामुळे त्यांना उभा महाराष्ट्र ओळखतो, याचा मला अभिमान आहे. मला एकहाती सत्ता द्या, मी चमत्कार घडवून दाखवेन. पुणे महापालिकेत १६२ नगरसेवक आहेत, येथेही बदल घडविणे नागरिकांच्या हाती आहे,’ असेही ठाकरे म्हणाले आहेत

Share this: