पुण्यातील येरवडा जेलचे गज कापून पळालेल्या तीस-या आरोपीस पोलीसांनी केली अटक

पुणे (वास्तव संघर्ष) पुण्यातील येरवडा कारागृहातून तात्पुरत्या इमारतीतून पाच कैद्यांनी काही दिवसांपूर्वी पलायन केले होते . बुधवारी मध्यरात्री खिडकीचे गज कापून या कैद्यांनी पळ काढला होता .खून , दरोडा आणि मोक्कासह गंभीर गुन्हे नोंद असलेले पाच कैदी 16 जुलै रोजी येरवडा कारागृह फोडून पळून गेले होते . यातील दोघांना यापूर्वी अटक केली होती . त्यानंतर यातील तिसऱ्या कैद्यालाही पुणे ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले .

देवगन अजिनाथ चव्हाण ( वय -25 ) असे या कैद्याचे आरोपीचे नाव आहे . अहमदनगर जिल्ह्यातील एका गावातून त्याला अटक करण्यात आली .

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड , हवालदार महेश गायकवाड , निलेश कदम , सचिन गायकवाड , पोलीस नाईक गुरु गायकवाड , सुभाष राऊत व श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे हवालदार अंकुश ढवळे यांनी केली आहे .

Share this: