क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

बालाजीनगर झोपडपट्टीत ‘या’ भाईची दहशत ; दहशतीमुळे नागरिक दरवाजे करतात बंद

भोसरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमधील बालाजीनगर झोपडपट्टीत एका भाईने उच्छाद मांडला आहे. “मी बालाजीनगरचा भाई आहे” असे म्हणून एकावर कोयत्याने वार केला आहे. ही घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास बालाजीनगर येथील मस्जिदसमोरील रोडवर भोसरी एमआयडीसी येथे घडली आहे. या भाईच्या दहशतीमुळे या भागातील नागरिक अक्षरशः दरवाजे बंद करून लपून बसले होते .

आदित्य बंडु फरताडे यांनी याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फारुख उर्फ फ-या सत्तार शेख( वय-24 रा- बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फारुख उर्फ फ-या याने त्याच्या हातात कोयता घेवून ” मी बालाजीनगरचा भाई आहे “असे म्हणून फिर्यादी आदित्य यांना म्हणाला “आता मी तुला मारुन टाकतो असे म्हणून त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादी आदित्य यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या मानेवर लोखंडी कोयत्याने वार केला असता तो फिर्यादी यांनी चुकवला व नंतर आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारत असताना फिर्यादीने तो उजव्या हाताने अडवला असता फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या कोप-या जवळ दुखापत होवुन फिर्यादी आदित्य जख्मी झाले. आरोपी फारुख उर्फ फ-या याच्या दहशतीमुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी भयभीत होऊन दरवाजे बंद करून आत बसले होते. आरोपी फारुख उर्फ फ-या फरार असून अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Share this: