बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील एचए मैदानावर स्वच्छता मोहीम राबवा : आमदार महेश लांडगे

पिंपरी(वास्तव संघर्ष) : हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीच्या पिंपरीतील मैदानावर कचरा आणि राडारोडा टाकण्यात येत आहे. स्वच्छता अभियानांतर्गत मैदानाची स्वच्छता करण्यात यावी, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या 10 क्रमांकामध्ये स्थान मिळवण्यासाठी सकारात्मक दृष्टीने चांगले प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शहर चकाचक होताना दिसत आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एचए (हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कंपनीच्या) मैदानावर अस्वच्छता पसरली आहे. याठिकाणी उघड्यावर कचरा टाकाला जातो. त्यामुळे अस्वच्छता झाली असून, दुर्गंधीही पसरली आहे.

संपूर्ण शहरातील मोकळ्या जागा स्वच्छ आणि सुंदर होत आहेत. ठिकठिकाणी सुशोभिकरणही करण्यात येत आहे. मात्र, एचए मैदानावर राडारोडा आणि कचरा दिसत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. आगामी काळात एचए मैदाना कंपनी व्यवस्थापनाला तात्काळ स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच, महापालिका प्रशासनाच्या वतीनेही एचए मैदानाची स्वच्छता मोहीम राबवावी, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

Share this: