धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये भव्य धम्म शांतता रॅली
पिंपरी (वास्तव संघर्ष) :अशोका विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये वाकड याठिकाणी समता व शांततेच्या रॅलीद्वारे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते असा संदेश देणार्या तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली इतिहास केला. या घटनेला आज 66 वर्षे पूर्ण झाल्याने देशातसह महाराष्ट्रात आंबेडकरी अनुयायी, विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळांच्या वतीने धम्ममय वातावरणात हा सोहळा साजरा केला. स्थानिक बुद्धविहारात विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी सामुहिक बुद्ध वंदना, धम्म वंदना व संघ वंदना घेण्यात आली. त्यानंतर भव्य स्वरुपात मिरवणूक काढण्यात आली.
या रॅलीत स्थानिक संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक प्रतिष्ठान ,अशोक वाघमारे बौद्धविहार संस्था,पोलीसलाईन मित्रमंडळ , सम्राट मित्रमंडळ,फुले शाहु आंबेडकर विचारमंच कस्पटे वस्ती ,धम्मदेशना बुद्धविहार संस्था, मानवता बुद्धविहार संस्था,योद्धा प्रतिष्ठान ,एकता मित्र मंडळ,सम्यक कर्म विहार ट्रस्ट ,अजिंक्य तारा मित्रमंडळ ,न्यु सदगुरु मित्रमंडळ या सह अनेक संस्थानी सहभाग घेतला होता. माजी नगनगरसेवक अश्विनी वाघमारे, बौद्ध समाज विकास महासंघाचे संस्थापक शरद जाधव,सामाजिक कार्यकर्ते विक्रम वाघमारे,माजी नगरसेवक विनायक गायकवाड , युवा नेते कुणाल व्हावळकर,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड,विशाल वाघमारे,सुनिल ढसाळ,निलेश वाघमारे ,युवा रत्न सचिन वाघमारे आणि 2000 पेक्षा जास्त नागरिकांनी या रॅलीत मोठ्याप्रमाणावर सहभाग घेतला.
या रॅलीचे आयोजन भीमगर्जना मित्रमंडळ विश्वस्थ संस्थेच्या जेतवन बुद्धविहार कमीटीचे पदाधिकारी बाबासाहेब साळवे ,शाम सोनावणे, अमोल म्हस्के ,आनंद जाधव, परिहार, दिपक कांबळे , तुषार भिंगारे ,अनिल साळवी ,निलेश खोब्रागडे ,संजय वाघमारे, संतोष गायकवाड ,सचिन गाडे ,दलीत गाडे ,सचिव बी. बी साळवे,अरुण वाघमारे यानी कमी वेळेत पण अतिशय शिस्तबद्ध असे नियोजन केले होते. या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष बि .जी .सुर्यवंशी यानी आभार व्यक्त केले.