दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना थरमॅक्स चौकातून केली अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड थरमॅक्स चौक येथे बकरी ईद निमित गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दिनांक ०१/०८/२०२० रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडून दोन आरोपींना बेकायदेशीररीत्या दोन पिस्तूल व चार जिवंत काडतुस जवळ बाळगणा-यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सोमनाथ भारत शिंदे ( वय 26 , रा.जय बजरंग हौसिंग सोसायटी , अजंठानगर , चिंचवड ) आणि मंगेश सुनील झुंबरे ( वय 28 , रा . केसनंद फाटा , वाघोली , पुणे ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .
गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार दीपक महादेव खरात यांनी शनिवारी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी शिंदे आणि झुंबरे हे दोघेजण दुर्गा चौक ते थरमॅक्स चौक या दरम्यान असलेल्या हुंदाई शोरुमजवळ येणार असून त्यांच्याकडे पिस्तूल आहे , अशी माहिती मिळाली . त्यानुसार शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पोलिसांनी आरोपींना सापळा लावून पकडले . त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली . पोलिसांनी आरोपींची दुचाकीसह एक लाख 52 हजारांचा ऐवज जप्त केला .
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री संदीप बिष्णोई , अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री सुधीर हिरेमठ , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री आर आर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट २ चे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड , पोलीस उप निरीक्षक संयज निलपत्रेवार , पोलीस कर्मचारी पोहवा . दिपक खरात , शिवानंद स्वामी , केराप्पा माने , प्रमोद वेताळ , वसंत खोमणे , मपोहवा उषा दळे , दिलीप चौधरी , विपुल जाधव , चेतन मुंढे , जयवंत राऊत , नामदेव राऊत , यांचे पथकाने केली.