पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी शाळेने साहित्य व फि भरण्यासाठी तगादा लावू नये ; मनसेचा शाळेला इशारा
पिंपरी (वास्तव संघर्ष) कोरोना विषाणू च्या मारामारी मध्ये आज सर्व सामान्य नागरिक त्रस्त असताना शहरातील खाजगी शाळा पालकांना शालेय साहित्य व फि भरण्यासाठी तगादा लावत आहे.
आजच्या परिस्थितीत सर्व नागरिकांना आर्थिक आडचणी मध्ये असताना शाळा प्रशासनाने सर्व सामान्य नागरिकांना वेठीस धरु नये. चालू शैक्षणिक वर्षासाठी शाळा चालू करण्यासाठी शासनाने कोणतेही धोरण ठरवले नसताना शाळा सर्व सामान्य नागरिकांना त्रास देत आहे.
या विषयावर महाराष्ट्र नवर्निमाण सेना पिंपरी-चिंचवड शहर यांनी शिक्षण मंडळातील उपअधिकिरी मा.पराग मुंडे यांना निवेदन दिले आहे. या वेळेस उपस्थित हेमंतभाऊ डांगे. शहर अध्यक्ष मनविसे. बाळा दानवले उपाध्यक्ष मनसे.मयुर चिंचवडे विभाग अध्यक्ष मनसे
आपल्या मार्फत महाराष्ट्र नवर्निमाण सेना सर्व नागरिकांना आव्हान करतेय कि जर कोणात्याही शाळेने फि किंवा शालेय साहित्य घेन्याची बळजबरी केली तर मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे