बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

मेट्रोच्या निगडीपर्यंत विस्तारावरून मनसे आणि भाजपमध्ये जुंपली ;राज्यसरकारच्या निर्णयावर दोघांचा श्रेयवाद

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोचे काम अंतीम टप्प्यापर्यंत आले असताना पिंपरी ते निगडीपर्यंत विस्तार व्हावा यासाठी महाविकास आघाडी राज्य सरकारने या मेट्रो मार्गास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. ही मान्यता आमच्यामुळेच देण्यात आल्याचे पालिकेत सत्ताधारी असलेली भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी श्रेयघेण्यास सुरवात केली आहे. याबाबत भाजपचे कला क्रिडा सभापती उत्तम केंदळे आणि मनसेचे गटनेते तथा शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी अधिकृत पञ काढत आमच्यामुळेच मेट्रो विस्ताराला मान्यता मिळाली आहे असे म्हटले.

स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गिकेला जोडून पुढे पिंपरी ते निगडी या वाढीव मेट्रो मार्गिकेला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी ९४६ कोटी ७३ लाख एवढा खर्च येणार असून राज्य सरकार १७० कोटी ३ लाख इतका खर्चाचा भार उचलणार आहे. दरम्यान, मेट्रो मंजुरीचे श्रेय लाटण्यासाठी भाजपा, आणि मनसे मध्ये चढाओढ सुरू आहे.

आमच्याच प्रस्तावा मुळे मेट्रोच्या विस्ताराला निगडीपर्यंत मंजूरी:–प्रा उत्तम केंदळे.

पिंपरी ते निगडी या उन्नत मेट्रो मार्गासाठी ९४७ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यातील ८० टक्के वाटा हा पालिकेचा आहे. तेवढाच नाही,तर संपूर्ण खर्चही उचलण्याची तयारी सत्ताधारी भाजप सत्तेत असलेल्या पालिकेने दाखवल्याने मेट्रो विस्ताराचा विषय चटकन मार्गी लागला. परिणामी दुसऱ्या टप्यात निगडीत जाणारी मेट्रो आता पहिल्या टप्यातच निगडीपर्यंत म्हणजे शहराच्या दुसऱ्या टोकापर्यंत २०२३ ला धावणार आहे.

आमच्याच प्रस्तावा मुळे मेट्रोच्या विस्ताराला निगडीपर्यंत मंजूरी मिळाल्याचे श्रेय घेण्यासाठी आता अनेकजण पुढे येतील.नुसती मागणी व आंदोलन करणे हे नावाला असते पण,त्यासाठी लागणारी प्रशासकीय प्रक्रिया, डीपीआरचा खर्च, पाठपुरावा आम्ही केला आहे. त्यामुळे हे कोणाचे यश आहे, हे न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही.

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही केलेल्या मागणीला आज खऱ्या अर्थाने यश:-सचिन चिखले

मेट्रो निगडी पर्यंत व्हावी हे सुरुवातीपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी होती निगडीतील हजारो नागरिकांचे विचार करून आम्ही वेळोवेळी प्रशासनाला जाग आणण्याचे काम केले आहे , वेळे प्रसंगी मेट्रोचे कामही बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेने दिला होता

आज राज्य सरकारने पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही केलेल्या मागणीला आज खऱ्या अर्थाने यश आले. निगडीतील प्रवासी नागरिकांना खऱ्या अर्थाने आज न्याय मिळाला पुढे हा लढा असाच चालू राहील केंद्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरवठा केला जाईल

Share this: