बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

तब्बल दोन वर्षानंतर पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष भिमजयंतीचा

पिंपरी (वास्तव संघर्ष) : महाराष्ट्रातील कोरोनाचे  सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना  दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधापासून मुक्तता मिळाली अशातच तब्बल दोन वर्षानंतर पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष भिमजयंतीचा करण्यात आला आहे.

जयभीमचा घोष, आदीवासी कलाकारांचा तारपा नृत्याचा अविष्कार आणि हेलीकॉप्टर मधून क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलीकॉप्टर मधून होणारी पुष्पवृष्टी अशा प्रकारे अभिवादन करुन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर पिंपरी चौक, एच.ए. कॉलनी, तसेच दापोडी चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. महानगरपालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयात प्लॉगेथॉन मोहिमे अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली यामध्ये नागरिक व कर्मचारी अशा 2781 जणांनी सुमारे 20 टन कचरा गोळा केला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Share this: