बातम्या

महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य;चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर केली शाईफेक

पिंपरी (वास्तव संघर्ष):पुण्याचे पालकमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून राज्यात टीकेची झोड उठली आहे. विरोधक आक्रमक झाले असून आंदोलन केले जात आहेत.

दरम्यान आज चंद्रकांत पाटील हे चिंचवड गावातील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी शहरात आले होते. त्यावेळी पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेस NSUI ने त्यांना चिंचवड स्टेशन येथे त्यांना काळे झेंडे दाखवले. तसेच, त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमातून बाहेर येत असताना अचानक एका व्यक्तीने त्यांच्या तोंडावर शाईफेक केली. चंद्रकांत पाटील जागेवर धडपडले यावेळी आजूबाजूच्यांनी त्यांना पकडले. या घटनेत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. अचानक झालेल्या शाईफेक आणि घोषणाबाजीमुळे गोंधळ निर्माण झाला.

चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळं अवघ्या राज्यात विरोधक, बहुजन समाजातील नेते आक्रमक झाले असून आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Share this: