क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

मारहाण करुन तो घराला बाहेरून कुलुप लावुन जायचा.. महिलेनं सांगितली धक्कादायक माहिती

पिंपरी (वास्तव संघर्ष) : प्रेमाचे नाटक करुन लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे. ही घटना सन 2019 पासुन ऑगस्ट 2022 पर्यंत डीवाय पाटील कॉलेज संत तुकाराम नगर पिंपरी येथे घडली आहे.

याबाबत पिडीत महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

अजिम नुरमहंमद तांबोळी (वय-31, रा.संततुकाराम नगर पिंपरी )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांच्या बरोबर आरोपी अजिम याने प्रेमाचे नाटक करुन फिर्यादी पहिल्यांदा राहत असलेल्या देवेंद्र डोईफोडे यांच्या रूममध्ये डीवाय पाटील कॉलेज जवळ हाऊस व नंतर वसंत जाधव यांच्या फ्लॅटमध्ये येवुन फिर्यादी यांना लग्नाचे अमिष दाखवून फिर्यादी यांच्या बरोबर वारंवार शरीर संबंध केले आहेत व फिर्यादी यांनी आरोपी अजिम याला लग्नाचे विचारले असता लग्नास नकार देवुन शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली तसेच तो मला घरामध्ये डांबुन ठेवुन घराला बाहेरून कुलुप लावुन जायचा आणि पोलीसांत तक्रार केली तर जिवे मारण्याची धमकी देत होता असे फिर्यादीने म्हटले आहे.

तसेच 22 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता ते रात्रौ 10 वाजताच्या सुमारास फिर्यादी हे क्लिनिकला गेले असताना फिर्यादि यांचे गैरहजेरीमध्ये फिर्यादी यांचे घरी येवुन फिर्यादीचे घराची एक चावी त्याचेकडे असलेने सदर चावीने घराचे कुलुप उघडुन फिर्यादी यांचे घरामध्ये शिरून घरामधील सामान अस्ताव्यस्त फेकुन देवुन , घरातील वस्तुंची तोडफोड करुन नुकसान केले आहे असे देखील फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करित आहेत.

Share this: