क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्र

शरद पवार गाडीवर पुणे पोलीसांची कार्यवाही

पुणे(वास्तव संघर्ष): पोलीस कर्मचारी,प्रेस,व्हीआयपी यांच्यासह वाहनांच्या नंबर प्लेटवर दादा, नाना, काका शरद,पवार अशी नावे लिहिणाऱ्या 283 जणांच्या गाडीवर पुणे वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. या वाहन मालकांकडून तब्बल दोन लाख 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे वाहतूक पोलिसांनी 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान नियमानुसार नंबर प्लेट नसलेल्या 283 वाहनांवर कारवाई केली. तसेच ही कारवाई भविष्यातही अशीच सुरू राहणार आहे ज्यांच्या नंबरप्लेट नाहीत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे आवाहनही पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सरकारी वाहनांव्यतिरिक्त वाहनधारकाला कोणत्याही खासगी वाहनावर महाराष्ट्र सरकार, भारत सरकारचे नाव, राष्ट्रचिन्ह, लष्कराच्या विविध प्रतिज्ञापत्रांची प्रतिकृती आणि पोलिस लिहिता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पोलिस चिन्ह किंवा फलक असा लोगो किंवा नाव वापरणाऱ्या खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने दिले आहेत.

न्यायालयाने दिलेल्या आदेशात वाहनांच्या नंबर प्लेटवर काहीही लिहू नये. मात्र काही नागरिक या आदेशाचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशी वाहने पोलिसांच्या नजरेतून सहज सुटतात. मात्र, आता त्या चालकांकडून महाराष्ट्र मोटार वाहन कायदा 2013 च्या कलम 134(6) नुसार शुल्क आकारले जाईल.

Share this: