बातम्यामहाराष्ट्र

रोहित पवारांची अवस्था पार्थ पवारपेक्षाही वाईट करू-डॉ.सुजय विखेपाटील

अहमदनगर :- पालकमंत्रीसाहेब, तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा. ती जबाबदारी माझी आहे. तुमच्या विकासाच्या झंझावाताची पाहिजे तेवढी प्रसिद्धी झाली नाही. मात्र, इतिहास घडवू, सर्वच कामे बोलून होत नाहीत. आजोबा बाळासाहेब विखे पाटलांसारखा गप्प बसून काम दाखवू, असे सांगून डाॅ. सुजय विखे यांनी कर्जत-जामखेडमधून लढू इच्छिणाऱ्या रोहित पवारांची अवस्था पार्थ पवारपेक्षाही वाईट करू, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. कर्जत येथील सत्कार समारंभात ते बोलत होते.

निवडणुकीत विजयी झाल्यानंतर, कर्जत येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलत असताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच पालकमंत्र्यांना धीरही दिला
पालकमंत्रीसाहेब, तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा. ती जबाबदारी माझी आहे. तुमच्या विकासाच्या झंझावाताची पाहिजे तेवढी प्रसिद्धी झाली नाही. मात्र, इतिहास घडवू, सर्वच कामे बोलून होत नाहीत.

आजोबा बाळासाहेब विखे पाटलांसारखा गप्प बसून काम दाखवू असे सुजय विखे यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, कर्जत-जामखेडमधून लढू इच्छिणाऱ्या रोहित पवारांची अवस्था पार्थ पवारपेक्षाही वाईट करू. असे वक्तव्यही त्यांनी केले.

Share this: