बांधकाम कामगार सेनेचे यश ;बांधकाम कामगारांच्या मागण्यांची आयुक्तांनी घेतली दखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ , पुणे विभागीय उपआयुक्त कार्यालयातील नोंदणी आणि मिळणारे लाभ याबाबतीतील गोंधळाबाबत बांधकाम कामगार संघटनेने कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता . त्यानंतर उपआयुक्त कार्यालयाने आपल्या मागण्यांचा विचार केला जाईल , दि . २५ रोजीचे आंदोलन करू नये असे लेखी पञ देऊन कळविले आहे .
याबाबत बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी कामगार उपआयुक्त कार्यालयाला विविध मागण्यांबाबत आंदोलन आणि बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता . संघटनेने केलेल्या मागण्यांची दखल घेत त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे उपआयुक्त कार्यालयाने संघटनेला कळविले आहे . तसेच संघटनेच्या ज्या कामगारांना अद्यापि लाभ मिळालेला नाही त्याचा तपशील कार्यालयास सादर करावा , असे कळविण्यात आले आहे .
तसेच नोंदीत बांधकाम कामगारांना कामगार सुविधा केंद्राचे काम पूर्ण झाल्यावर स्मार्ट कार्ड वाटपाबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याने आंदोलन मागे घ्यावे , असे आवाहन कामगार संघटनेस करण्यात आले आहे .