बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील नेहरुनगर रस्त्याचे फेर सर्व्हेक्षण करा-डॉ. कैलास कदम


पिंपरी (वास्तव संघर्ष ) पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती असणा-या गांधीनगर झोपडपट्टीचे तीस वर्षांपूर्वी सर्व्हेक्षण झाले होते. त्याच आधारे आता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नेहरुनगर रस्त्याचे गांधीनगर झोपडपट्टीच्या बाजूने रुंदीकरण करण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नियोजन केले आहे. रस्त्याचे हे रुंदीकरण म्हणजे याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून रहात असणा-या गोरगरिब नागरिकांवर अन्यायकारक आहे असे डॉ. कैलास कदम सांगितले.

या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गांधीनगर परिसरातील बाधित नागरिकांनी माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 28) महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. मोर्चाचे नंतर सभेत रुपांतर झाले. कदम यावेळी म्हणाले की, गांधीनगर झोपडपट्टीच्या समोर उच्चभ्रू नागरिकांची सोसायटी आहे. रस्ता रुंदीकरण त्या बाजूने व्हावे. विकास कामांना आमचा विरोध नाही पंरतू बाधित नागरिकांचे आहे त्याच परिसरात पुर्नवसन करावे. अशी नागरिकांची मागणी आहे. तसे निवेदन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम आणि शिष्ठमंडळाने दिले.

Share this: